शाहरुख खानची लेक क्रिकेटर रिंकू सिंहबरोबर फिरायला गेली? समुद्रकिनाऱ्यावरील….

भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंह सध्या चांगलाच चर्चेत आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज आणि रिंकूचा विवाह होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या दोघांच्या नातेवाईकांनाही घरातील वरिष्ठ लोकांची चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. हे नातं जवळपास निश्चित मानलं जात आहे. असं असतानाच सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी तसेच अभिनेत्री सुहाना खान आणि रिंकू सिंहचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर अनेकांनी सुहाना आणि रिंकूचे फोटो शेअर केले असून या फोटंची चांगलीच चर्चा दिसून येत आहे.या फोटोंमध्ये रिंकू हा शर्टलेस असून सुहाना सुद्धा बीचवर परिधान करतात तशा कपड्यांमध्ये दिसत आहे. हे दोघेही सुट्ट्यांसाठी एकत्र भटकंती करत आहेत, असा दावा करण्यात येत आहे. दोघेही एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर रिंकू आणि सुहाना बाजूबाजूला बसले असून दोघेही हसताना दिसत आहेत. केवळ फेसबुकच नाही तर इन्स्टाग्राम आणि एक्स (आधीच्या ट्वीटरवरही) हे फोटो चर्चेत आहेत.

मात्र या फोटोंबद्दल आणि त्यासंदर्भात केल्या जात असलेल्या दाव्यांबद्दलचं सत्य समोर आलं आहे. रिंकूच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या फॅन पेजेसवरुनही हे फोटो शेअर करण्यात आलेत.हे फोटो कोणत्याही विश्वासार्ह खात्यांवरुन शेअर करण्यात आलेले नाही. तसेच अनेक एआय इमेज डिटेक्शन वेबसाईटवरही हे फोटो एआयवर बनवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ‘हाइव्ह मॉडरेशन’ नावाच्या वेबसाईटने तर या फोटोंमधील 99.8 टक्के भाग हा एआय जनरेटेड असून यामध्ये डिपफेक कंटेट वापरण्यात आल्याचं म्हटलं आहे.

‘साइटइंजिन’ या वेबसाईटनेही सदर फोटोमधील 99 टक्के भाग हा एआय वापरुन तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. स्टॅब डिफ्युजन या स्टॅबिलीट एआयच्या मदतीने हे फोटो तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ‘वॉज इट एआय’ या वेबसाईटनेही सदर फोटोंपैकी बराचसा भाग हा एआयवरुन बनवण्यात आला आहे असं सांगितलं आहे.