प्रत्येक भागात अनेक कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात. अनेक यात्रा तसेच वाढदिवस निमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. सध्या बैलगाडी शर्यत खूपच गाजावाजा करीत आहे. आटपाडीत उद्या ३१ जानेवारीला महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आटपाडी तालुक्याचे सुपुत्र यशस्वी उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ( अजित पवार गट) विनायक रावजी मासाळ साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता आटपाडी- शेटफळे रोड गोंदिया येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत २०२५ चे आयोजन विनायकराव मासाळ युथ फाऊंडेशन पंचप्रेमी गोंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे या भागातून मोठ्या संख्येने स्पर्धक येणार असून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक तानाजीराव पाटील यांनी स्पर्धेचा आढावा घेत यशस्वी करण्याचे आवाहन केले. अकरा लाखाहून अधिक भरघोस बक्षीस व परितोषिक असल्यामुळे या स्पर्धेला वेगळे महत्व प्राप्त झाले असून मान्यवर मंत्री उपस्थित राहणार असून भव्य दिव्य असा स्पर्धेचा थरार आटपाडी कर व पर जिल्ह्यातून आलेल्या उपस्थित सर्व नागरिकांना अनुभवास मिळणार आहे.
माननीय महोदय दत्तामामा भरणे (क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री), मा. शंभूराजे देसाई ( पर्यटन व खाण मंत्री ) यांच्या शुभ हस्ते बक्षिसाची वितरण होणार असून उपस्थित प्रमुख पाहुणे संजय काका पाटील (माजी खासदार सांगली लोकसभा), सुहास भैया बाबर ( खानापूर आटपाडी विधानसभा), मा. इंद्रिस नायकवडी ( विधानपरिषद आमदार राष्ट्रवादी), मा. सुरज चव्हाण ( युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), मनी बाबासाहेब देशमुख ( आमदार सांगोला विधानसभा ), मा. अमरसिंह देशमुख (माजी जिल्हा परिषद सदस्य सांगली) मा. तानाजीराव पाटील (संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक), मा. भारत तात्या पाटील (चेअरमन सावित्री उद्योग समूह आटपाडी), शशिकांत तरंगे (राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते), चंद्रहार पाटील (डबल महाराष्ट्र केसरी), प्रताप नाना पाटील ( जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), भैय्यासाहेब बंडगर (उपाध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य), विष्णू माने (मा. नगरसेवक राष्ट्रवादी सांगली),
मनोज सरगर (मा. नगरसेवक सांगली) मा. राहुल हजारे (ऊऊठ.ड. ग्रुप एमडी) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे प्रथम क्रमांक बक्षीस ५,०९,००० हजार रोख रक्कम व पारितोषक, द्वितीय क्रमांक ३,००,००० रोख रक्कम व पारितोषक, तृतीय क्रमांक १,००,००० रोख रक्कम व चषक, चतुर्थ क्रमांक ८०,००० रोख रक्कम व चषक, पाचवे क्रमांक ५०,००० रुख रक्कम व चषक, सहावा क्रमांक ४०००० रोख रक्कम व चषक, सातवा क्रमांक ३०००० रक्कम व चषक, सेमी फायनल मध्ये दोन नंबर उतरणाऱ्या बैलगाडा ला ११००० चे रोख रक्कम व चषक देण्यात येणार पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ११ लाखाहून अधिक बक्षीस वितरण बैलगाडा महाराष्ट्र केसरी सर्वात मोठ्या रकमेची मैदान आटपाडी येथे होत असून आटपाडी व आटपाडी तालुक्यातील परजिल्ह्यातून येणाऱ्या सर्व स्पर्धकांसाठी, नागरिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार असून लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विनायकराव मासाल साहेब, विनायकराव मासाळ युथ फाऊंडेशनव पंचप्रेमी गोंदियाच्या वतीने करण्यात आले आहे
