आष्ट्यातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध

आष्टा, स्व. विलासराव शिंदे आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून आष्टा शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. यापुढील काळातही शहराच्या विकासाची गती वाढवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. आष्टा शहरातील सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन विश्वराज शिंदे यांनी केले.

आष्टा शहरातील विशाल नगर येथे पाच लाख ४८ हजार रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वसंत कांबळे, हरिदास डोंगरे, संजय जाधव, शामराव चौगुले, उमेश पारसे, महीपती फाळके, दीपक शिंदे, बाळासाहेब पाटील, गणेश सूर्यवंशी, कपिल माळी, संजय इटकरकर, कुलकर्णी साहेब, संजय माने, प्रकाश चौगुले, प्रदीप जाधव, रेवले मेहराबान, केदार माळी, भागेश सपकाळ, रमेश जाधव, अक्षय शिंदे, कुमार पाटील, दत्तात्रय पाटील, जय चौगुलेंसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विश्वराज शिंदे म्हणाले, आष्टा शहरातील प्रत्येक नागरिकाचा विकास हा आमचा प्रमुख उद्देश आहे. विशालनगर परिसरातील हा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत दूरावस्थेत होता. नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या तक्रारी आम्ही गांभीर्याने घेतल्या आणि नागरिकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. आज या कामाचा शुभारंभ होत आहे. यामुळे अतिशय समाधान वाटत आहे.