खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार टेंभू योजनेचे जनक अनिलभाऊ बाबर यांच्या आकस्मिक जाण्याने खानापूर विधानसभा मतदारसंघात एक पोकळी निर्माण झाली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार टेंभू योजनेचे जनक स्व. अनिलभाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त गार्डी येथील पवई टेक येथील जीवनप्रबोधिनी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली.
यावेळी अनेकांनी अनिलभाऊंच्या जुन्या आठवणीना उजाळा देत डोळ्यातील अश्रूंना वाट देत नमस्कार करून आपुलकी व्यक्त करत होते. अनेक भावनिक क्षण डोळ्यात साठवण्यासारखे होते. स्व. अनिलभाऊंच्या आठवणी व स्मृती जनमानसात कायमस्वरूपी स्मरणात राहाव्यात यासाठी बाबर कुटुंबीयांनी अनिलभाऊंच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पुष्पांजली वाहण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीस भगवद्गीता ग्रंथ भेट दिला. बाबर कुटुंबीयांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.