सध्या सरकारकडून अनेक नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. ज्याचा पुरेपूर लाभ नागरिक घेतच आहेत. पण अनेक नागरिक असे आहेत जे सरकारच्या दिलेल्या आदेशाचे पालन करीत नाहीत. अनेक नागरिक वीजबिल थकीत ठेवण्याचे प्रकार अलीकडे खूपच वाढत आहेत. वेळोवेळी वीजबिल भरण्याचे आवाहन देखील नागरिकांना करण्यात येते पण याकडेही नागरिक दुर्लक्ष करीत आहेत.
सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांसाठी महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका ! आणली आहे. जानेवारी ते मे या काळात ही योजना राबविली जाणार आहे. यात प्रत्येक उपविभागस्तरावर ५ बक्षिसे देण्यात येणार असून एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक विभागातील १५९ उपविभागांसाठी एकूण २ हजार ३८५ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या योजनेमध्ये प्रत्येक उपविभागासाठी प्रथम एक स्मार्ट फोन, द्वितीय दोन स्मार्ट फोन आणि तृतीय बक्षिस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ असे प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यासोबतच प्रत्येक बक्षिसासाठी दोन विजेत्याची प्रतीक्षा यादी राहणार आहे. संपर्क करूनही विजेत्यांनी १० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी व इतर कारणांमुळे अपात्र असल्यास प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बक्षिस देण्यात येतील.
तसेच ही योजना कोल्हापूर जिल्ह्यात ३१ उपविभाग आहेत. या प्रत्येक उपविभागासाठी ५ बक्षिसे ठेवण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा या योजनेत सहभाग असणार आहे. तसेच मागील महिन्याच्या वीजबिलाची १० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार असून योजनेच्या कालावधीत ग्राहक, ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील. असे महावीतरणने कळवले आहे.