शिरोली औद्योगिक वसाहतीत ३ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद

शिरोली औद्योगिक क्षेत्रादरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिरोली औद्योगिक क्षेत्रामधील पाणीपुरवठा सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ पासून रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा अपुऱ्या दाबाने असणार आहे. याची उद्योजकांनी नोंद घ्यावी व पुरेसा पाणीसाठा करून महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन उपअभियंता विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग कोल्हापूर यांच्याकडून पत्राद्वारे केले आहे.