सध्या प्रत्येक भागात हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.यामुळे भागाचा विकास होण्यास मदत देखील होत आहे. वाळवा तालुक्यातील ताकारी येथील ग्रामपंचायतीने विधवा परंपरेला फाटा देत हळदी- कुंकू कार्यक्रमात वाण व फळांची रोपे व कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. सरपंच प्रा. प्रणाली पाटील यांच्या पुढाकाराने दुसऱ्या वर्षी रूढी आणि चालींना छेद देत माझी वसुंधरा अभियानांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला.
महिलांना वाण म्हणून फळ, फुलझाडे व कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. माध्यमातून ग्रामपंचायतीच्या परिसरातील महिलांना संक्रांतीचे हळदी- कुंकू महिला स्नेहमेळावा, निर्भया पथकातर्फे व्याख्यान आयोजित केले. संपतराव वारके प्रमुख पाहुणे होते. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निर्भया पथक प्रमुख पोलिस हवालदार वनिता पाटील, प्रियांका देसाई, महिला पोलिस, निर्भया पथक, सुनील पाटील, उपस्थित उपस्थित होते. प्रा. नीता पाटील, मुख्याध्यापक अल्पना थोरात, उपसरपंच प्रणिता पेठकर, ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी पवार, सुवर्णा पाटील उपस्थित होत्या. पार्वती खेमचंद विद्यामंदिर याच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.