अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. रस्ते, पाणी, वाहतूक, आरोग्य याबाबतीत नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हातकणंगले येथे खणभाग यासह विविध परिसरातील रस्ता खडीकरण, डांबरीकरण व ओढ्यावरील पूल बांधकाम शुभारंभ करण्यात आला. युवकांनी संघटितरित्या सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे, त्यांना निश्चितपणे ताकद देऊ, अशी ग्वाही आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक अभिजीत लुगडे यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे, आम. राहुल आवाडे यांच्या माध्यमातून हातकणंगले गावातील विकासकामांसाठी सुमारे ६.५ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे सांगितले.
यावेळी आम. राहुल आवाडे, माजी नगरसेवक अजित लुगडे, ठेकेदार विजय भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दयासागर मोरे, संदीप कांबळे यांनी आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या विकासकामांबद्दल गौरवोद्गार काढून जनता नेहमीच त्यांच्या पाठिशी राहील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष अमिन मुजावर, विनायक मोरे, अनिस मुजावर यांच्यासह माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
