विट्यात १६ फेब्रुवारी रोजी होणार धनगर समाजाचा वधू – वर मेळावा

सध्या लग्न करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. योग्य वर तसेच वधू मिळत नसल्याने अनेकांना लग्नासाठी वाट पहावी लागते. पण या सर्वासाठी वधू वर मेळाव्याचे आयोजन अनेक भागात करण्यात येते. समस्त खानापूर तालुका धनगर समाज आणि तिरकवाडी (ता.फलटण) येथील अहिल्यादेवी वधु-वर सुचक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विटा येथील हॉटेल सिध्दी हॉलमध्ये रविवार, दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी धनगर समाजाचा वधु-वर मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक आणि अहिल्यादेवी वधु- वर सुचक मंडळाचे संस्थापक रणजित सोनवलकर यांनी दिली.

रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत धनगर समाजाचा वधु-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तिरकवाडी (ता. फलटण) येथील अहिल्यादेवी वधु-वर सुचक मंडळ हे गेल्या २३ वर्षापासून सातत्याने विविध मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक ठिकाणी वधुवर मेळावा आयोजित करत आहे.

या वधुवर मेळाव्यास उदघाटक म्हणून माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक राजेंद्र गावडे आणि समता शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नंदाताई खोत आणि माजी समाजकल्याण सभापती किसन जानकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.