सध्या प्रत्येक भागात अनेक विकासकामे सुरु आहेत. रस्ते, पाणी, वाहतूक याबाबतीत असणाऱ्या सर्व समस्या दूर करून विकासकामे सुरु आहेत. अनेक नेतेमंडळींकडून निधी देखील मंजूर केले जात आहेत. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीच्या फंडातून व जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या विकास कामाचा शुभारंभ गौरीशंकरनगर येथे काँक्रीट कामांना मंगळवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
तारदाळ मधील गौरीशंकर नगर परिसरात तारदाळ ग्रामपंचायत फंडातून ३० मीटर व जिल्हा परिषद फंडातून ६० मीटर इतक्या लांबीच्या बंदीस्त गटर्स कामासाठी मंजूर झालेल्या निधीच्या विकास कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. सदर शुभारंभ प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे, सौ. पल्लवी पोवार, विनोद कोराणे, प्रविण पाटील, मालुबाई चौगुले, सुवर्णा दाते, रणजित पोवार, अशोक चौगुले, अनिता जाधव, निर्मला भागवत, सुनिल पाटील, सचिन पाटील, प्रकाश फातले, सागर पाटील यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.