प्रत्येक भागात काही ना काही कर्यक्रमांच्या निमित्ताने अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील पहायला भेटतो.पट्टणकोडोली येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढ दिवसा निमित्त हाताने बैल पळवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती. दरवर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. तसेच या वर्षीही एकनाथ शिंदे यांच्या वाढ दिवसानिमित्त ही स्पर्धा ठेवण्यात आली होती.
सदर स्पर्धेसाठी गावातील लोक तसेच राजकीय मंडळी उपस्थित होती. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य शरद पुजारी, मधुकर पोवार, अंबर बनगे, रवींद्र आडके, सुधाकर पोवार, आनंदा पाटील व धनगर समाजाचे पंच लक्ष्मण पुजारी तसेच आर पी आय पक्षाचे तालुकाप्रमुख अनिल कांबळे शिव सेना उप जिल्हा प्रमुख विजयकुमार स्वामी शिवसेना पट्टणकोडोली शहर प्रमुख शिवानंद पणदे, अरविंद जाधव, नारायण जाधव, संतोष परीट, बाळू पणदे, विशाल आवटे, कपिल बोरगावे, संदीप पणदे, विशाल पणदे, सुमित पोवार युवा सेना उपविभाग प्रमुख अभिजीत भालबर त्याबरोबर अनेक कार्यकर्ते व गावातील लोक सदर कार्यक्रमास उपस्थित होते.