इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये तसेच इमारतीमध्ये बसविणेत येणार अग्नीशमन यंत्रे

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात सध्या अनेक विकासकामांचा धडाका सुरु आहे. अनेक प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. इचलकरंजी महानगरपालिकेकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये त्याचबरोबर महानगरपालिकेच्या सर्व इमारती मध्ये अग्नीशमन यंत्रे बसविणेच्या सुचना आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिलेल्या होत्या.

या सुचनेनुसार महानगर पालिकेकडून ३०० अग्निशमन यंत्रे खरेदी करणेत आलेली असुन या यंत्रांचे आणि त्याचबरोबर वाहन विभागासाठी खरेदी करणेत आलेल्या महिंद्रा बोलेरो या गाडीचे पुजन आज अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या हस्ते करणेत आले.