आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या २४ लाख रुपये खर्चाच्या पार्किंग शेडचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांची संख्या मोठी असून त्यांना वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णालय परिसर आवारात लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे प्रसंगी रुग्णसेवेत अडथळा निर्माण होते. त्यामुळे वाहनतळाची गरज ओळखून आमदार राहुल आवाडे यांनी याठिकाणी वाहनतळ उभारणीबाबत मागणी केली होती.
त्यांच्या प्रयत्नातून वाहनतळ बांधण्यासाठी २४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. या वाहनतळाचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार राहुल आवाडे आणि रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा मजुर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद पोवार, विठ्ठल पाटील, सचिन हेरवाडे, नितेश पोवार, रमेश पाटील, कपिल शेटके, विजय पाटील, चंद्रकांत कोष्टी, आप्पा रावळ, मारुती बुनांद्रे, महादेव कोरवी, प्रथमेश पोवार, सपना भिसे, अर्चना कुडचे आदींसह रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.