आष्ट्यात आज स्व. विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

प्रत्येक भागात अनेक कार्यक्रमानिमित्त अनेक विविध सामाजिक मनोरंजनात्मक कार्यक्रम स्पर्धा घेतल्या जातात. याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील मिळतो. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, राजाराम शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आष्टा येथील शक्तीस्थळी अभिवादन, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, गरजू रुग्णांसाठी व्हील चेअर, आयसीयु बेड, वॉकर वाटप होणार आहे अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे यांनी दिली. 

शनिवारी १५ रोजी स्व. विलासराव शिंदे यांची ८९ वी जयंती होत असून सकाळी साडेनऊ ते १२ वाजेपर्यंत आष्टा येथील राजाराम शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील स्व. विलासराव शिंदे शक्तीस्थळास अभिवादन करण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप होईल. विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात येईल. गरीब, गरजू रुग्णांसाठी व्हील चेअर, आयसीयु बेड, वॉकर वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता शिंदे चौक येथे पश्चिम भाग विकास सोसायटीचे स्व. माजी आमदार विलासराव शिंदे पश्चिम भाग विकास सोसायटी नामांकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होईल. शनिवारी सकाळी साडेनऊ ते एक वाजेपर्यंत स्मारक शक्तीस्थळी विविध कार्यक्रम होतील.