उद्योग वाढीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करू; आमदार डॉ. अशोकराव माने यांचे आवाहन

कागल – हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले (मॅक) च्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या सेवा दवाखाना (ईएसआय) हॉस्पिटलच्या अत्याधुनिक हेल्थ एटीएम मशीनच्या उद्घाटन सोहळा संपन्न झाला.सध्या बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारी कमी झाली पाहिजे. त्यामुळे उद्योग वाढले पाहिजेत त्यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करू असे आवाहन आमदार डॉ. अशोकराव माने यांनी केले.

उद्योजकांच्यातीलच मी एक घटक आहे.उद्योगधंद्यामध्ये अनेक लोक पुढे येत आहेत. पण जागा उपलब्ध नसल्यामुळे उद्योजकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. जे प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी आपण उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून ते प्रश्न मार्गी लावू असे ते शेवटी म्हणाले. यावेळी मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजय जोशी, सुरेश क्षीरसागर, अमृतराव यादव, अशोक दुधाणे, यशवंत पाटील, मुबारक शेख, भावेश पटेल, कुमार पाटील, शिवाजी भोसले, सचिन कुलकर्णी, सत्यजित सावंत तसेच हर्षल कांबळे व इतर स्टाफ तसेच कैलास जाधव, अरूण खोजगे व इतर मान्यवर उद्योजक उपस्थित होते.