आमदार डॉ.बाबसाहेब देशमुख व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा आज खवासपूर ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचे आयोजन……

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक चढउतार, राजकीय समीकरणे बदलल्याचे तसेच अनेक पक्षप्रवेश पहायला मिळाले. सांगोला‌ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख तसेच माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांचा खवासपुर येथेे मोहिते पाटील समर्थ शेतकरी कामगार पक्ष व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार दि.१६/२/२०२५ रोजी सायंकाळी ६-३० वाजता खवासपुर ग्रामपंचायत कार्यालया समोरील भव्य पटांगणात संपन्न‌‌ होणार आहे तरी सर्व नागरीकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन खवासपूर मोहिते पाटील समर्थक तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे .