वाळव्यातील पंचकल्याणमध्ये ४० बाल श्रावकांच्या मुंजी…

 
वाळवा येथील आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कोट भागच्या पंचकल्याण महोत्सवात ४० बाल श्रावकांच्या मुंजीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. पंचकल्याण महापूजेमध्ये जैनधर्मीय बाल श्रावकांच्या मुंजीची प्रथा आहे. पंचकल्याण पुजेचे यजमान महावीर होरे व सौ. वंदना होरे आहेत. सर्व मुनीवरांना सवाद्य मिरवणुकीने आणून दैनिक पुजाअर्चा सुरु आहे. सोमवारी दैनंदिन कार्यक्रमांसह सकाळी ४० बालश्रावकांचा मौजीबंधनाचा कार्यक्रम उत्साहात झाला.

मौजीबंधन संस्कार मुनिमहाराजांनी केले. दुपारच्या सत्रात तिर्थंकरांचा राज्याभिषेक, ५६ देशांच्या राजांकडून नजराणा निलांजना नृत्य, वैराग्य भावना देवागमन, दिक्षा वनाकडे पालखीतून प्रयाण, दिक्षा कल्याणक, शास्त्र मिरवणूक आदी विधी कार्यक्रम पार पडले. या मिरवणुकीत कर्नाटकातील मुखवटाधारी महिलांचे नृत्य प्रेक्षकांची विशेष दाद मिळवित आहेत. सकल दिगंबर जैनसमाज, वीर सेवादल वीर महिला मंडळ, धर्मसागर पाठशाळा, वीराचार्य झांजपथक कोटभागचे तरुण कार्यकर्ते सोहळयासाठी अथक परिश्रम घेत आहेत.