अनेक भागात अनेक क्रांतिकारकांचे, समाजसुधारकांच्या आठवणीत पुतळे उभारलेले आहेत. राजे उमाजी नाईक हे स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक होते. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी आणि कंपनी शासनाविरुद्ध लढा दिला होता. त्यांना क्रांतिवीर राजे उमाजी नाईक म्हणून ओळखले जाते. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आष्टा नगरीमध्ये लढा उभा करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार संघटना आष्टा शहराध्यक्ष संदीप कुडचीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
इंग्रजांच्या विरुद्ध सैन्य उभा करणे आणि सलग १४ वर्षे इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे राजे उमाजी नाईक यांचे विचार समाजामध्ये रुजवण्याच्या अनुषंगाने आम्ही हा आहोत असे ते म्हणाले. ७ सप्टेंबर १७९१ रोजी भिवंडी येथे जन्मलेल्या राजे उमाजी नाईकांनी आपल्या लढयात समर्थपणे स्वतःची आहुती दिली. आजीवन त्यांनी रामोशी समाजाचे समर्थ नेतृत्व केले.
या पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामे आष्टा नगरीतील सामाजिक सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन आम्हा रामोशी बांधवांना सहकार्य करावे आणि हा पुतळा उभा करण्यासाठी आमच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावे, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्यामुळे त्यांच्या कार्याची सतत आठवण तेवत राहिल, त्यामुळे पाठीशी रहावे, असे आवाहन संदीप कुडचीकर यांनी केले आहे.
