एमडी ड्रग प्रकरणात तपासात विट्यात जे घडले आणि गेल्या काही काळात दोन खून, अपहरण, लुटीच्या घटना, वाढती गुन्हेगारी आणि सहज नशेचे पदार्थ मिळणे लक्षात घेतले तर संपन्न विटा शहरातील जनता अस्वस्थ बनली आहे. त्यासाठी विटातील गुन्हेगारी मोडून काढणारी एक स्वतंत्र टीम जिल्ह्यातून पाठवण्याची मागणी केली यावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना आदेश दिले, यापुढे एक पथक यावर नेमण्यात येईल, ज्यावर जिल्ह्यातील एक वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवेल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
विट्यातील गुन्हेगारीवर आता जिल्ह्यातून लक्ष….
