बोरगाव येथील शिव कालीन शस्त्र प्रदर्शनास आ. जयंतराव पाटील यांची भेट

अनेक भागात विविध सामाजिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १९ फेब्रुवारीला सर्वत्र शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे शिव जयंती व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील प्रतिक परिवार प्रतिष्ठानच्या वतीने शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित केले होते.

या प्रदर्शनास आ. जयंतराव पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन प्रदर्शनातील शस्त्रे पाहून त्याची माहिती घेतली. युवा इतिहास अभ्यासक अतुल मुळीक (वाटेगाव) यांनी आ. पाटील व प्रतिकदादा पाटील यांना प्रदर्शनातील शस्त्रांची माहिती दिली. तत्पूर्वी आ. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रतिक परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी आ.पाटील व प्रतिकदादा पाटील यांचा सत्कार केला. माजी उपसरपंच पै. विकास पाटील, शिवाजी वाटेगावकर, कृष्णेचे माजी संचालक उदय शिंदे, युवक राष्ट्रवादीचे तालुका  कार्याध्यक्ष देवराज देशमुख, लाल- साहेब वाटेगावकर, मानाजी पाटील, युवराज कांबळे, जयसिंग शिंदे, सागर शिंदे, अरुण वाटेगावकर, तसेच गावातील मान्यवर, युवक व प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. शंकर कदम स्वागत, प्रास्ताविक केले.