आज खानापुरात आरोग्य शिबिराचे आयोजन

विविध कार्यक्रमानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. जेणेकरून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल. आज शुक्रवारी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सांगली व राजारामबापू पाटील कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.