हुपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ मूर्तीचे काम त्वरित सुरु करण्याची छत्रपती ग्रुप ची निवेदनाद्वारे मागणी

प्रत्येक भागातील नागरिकांकडून अनेक मागण्या केल्या जातात. काही वेळा या मागण्या पूर्ण केल्या जातात तर काही वेळा या मागण्या पूर्ण होण्यास विलंब लागतो. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ मूर्तीचे काम काही महिन्यांपासून बंद आहे हे काम निधीअभावी थांबले होते परंतु निधीची तरतूद झालेली असून अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ मूर्तीचे काम त्वरित सुरु करा अशी मागणी छत्रपती ग्रुपच्या वतीने हुपरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी छत्रपती ग्रुपचे हातकणंगले लोकसभा संपर्कप्रमुख सौरभ खोत, हुपरी शहरप्रमुख अभिनंदन माणकापुरे, रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी, सामाजिक कार्यकर्ते संजय चौगुले, विशाल मोरे, शुभम चोपडे, प्रदीप चव्हाण, संग्राम जाधव, सागर गायकवाड, लक्ष्मण कुंभार, अरुण वाईगडे, कुमार आलासे, उत्तम चव्हाण, लखन हजारे, श्रावण महेकर आदीसह शिवभक्त व नागरिक यांच्या सह्या निवेदनावर आहेत.