अनेक भागात अनेक बैलगाडा शौकिन यांची संख्या भरपूर आहे. अनेक कार्यक्रमानिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येते. संपूर्ण जुन्या खानापूर तालुक्यात बैलगाडा शर्यतीसाठी नावाजलेल्या व ५० वर्षांची परंपरा असणाऱ्या वांगी (ता. कडेगाव) येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवी यात्रेची सांगता बैलगाडा शर्यतींनी झाली. पंढरीनाथ फडके व शिवांश घोरपडे यांचा तुफान आणि विक्रम चव्हाण, तांबवे यांचा सुंदर या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपये रोख व मानाची ढाल मिळवली. द्वितीय क्रमांक पीयूष शिंदे घरनिकी यांचा डस्टर आणि मुकुंद शेठ भोर यांचा संग्राम या बैलजोडीने पटकावला तर तृतीय क्रमांक बाजीराव शेट घरनिकी यांचा छव्या आणि प्रवीण मिस्त्री भुईज यांचा शंभू या बैलजोडीने पटकावला.
तर मोहिल शेठ धुमाळ, सुसगाव यांचा बकासुर आणि प्रकाशबापू फडतरे यांचा वजीर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. खानापूर तालुक्यात अत्यंत मानाची समजल्या जाणाऱ्या वांगीतील बैलगाडा शर्यतीत पंढरीनाथ फडके व शिवांश घोरपडे यांचा तुफान आणि विक्रम चव्हाण तांबवे यांचा सुंदर या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपये रोख व मानाची ढाल मिळवली.
द्वितीय क्रमांक पीयूष शिंदे घरनिकी यांचा डस्टर आणि मुकुंद शेठ भोर यांचा संग्राम या बैलजोडीने पटकावत ७१ हजार रुपये व मानाची ढाल मिळवली. तृतीय क्रमांक बाजीराव शेट घरनिकी यांचा छब्या आणि प्रवीण मिस्त्री भुईज यांचा शंभू या बैलजोडीने पटकावत ६१ हजार व मानाची ढाल पटकावली.
