सध्या प्रत्येक भागात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये महिलांसाठी सध्या होम मिनिस्टर कार्यक्रम सऱ्हास घेत असल्याचे पहायला मिळत आहे. आष्टा नगरीमध्ये निनाई आदिष्ठा केदारलिंग देवस्थान ट्रस्ट आष्टा यांच्यावतीने संदीप भाऊजी कुडचीकर यांचा खेळ मनोरंजनाचा आनंद उत्सव महिला माता-भगिनींचा अर्थात खेळ पैठणीचा म्हणजेच होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता.
आष्टा आणि पंचक्रोशीतील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. निनाई आदिष्ठा केदारलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य आणि चांदोली ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाप या विषयावर मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण संदीप कुडचीकर यांनी केले. कुडचीकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. निवेदन, सूत्रसंचालन, गायन अंकुश राजमाने यांनी केली. व्हिडिओ चित्रीकरण रिल्स स्टार किसन रेवले तर सहयोगी भूमिकेत स्वाती कुडचीकर, अर्चना राजमाने