इस्लामपूर येथील ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात त्र्यंबकेश्वराची प्रतिकृती! आज उद्या भक्तांना दर्शनासाठी राहणार खुले..

आज सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जात आहे. यानिमित्ताने अनेक भरगज्ज कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत. आज बुधवारी होणाऱ्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने इस्लामपूर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यावतीने देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वराची प्रतिकृती बनविली आहे. त्याचबरोबर अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय असणारे  होलोग्राफिक शिवलिंग दर्शन करता येणार आहे.

मंगळवार २५ फेब्रुवारी सकाळी ठीक ८.३० वाजता या प्रतिकृतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. २६, २७ फेब्रुवारी दोन दिवस सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत भक्तांना दर्शनासाठी खुले राहील. शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय इस्लामपूर शाखेच्या वतीने केले आहे.