गोटखिंडी सायकल रॅलीचे प्रतापसिंह माने विजेते

आष्टा, गोटखिंडी (ता. वाळवा) येथे श्री गणेश सायकल रॅलीचे आयोजन शंभरहून अधिक सायकल करण्यात आले होते. १६ स्वारांचा सहभाग किलोमीटरचे अंतर ४८  मिनिटांमध्ये पार करीत प्रताप माने प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. स्पर्धेत पाच वर्षाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्ती सहभागी होते. लकी ड्रॉ पद्धतीने मारुती गुरव यांना सायकल बक्षीस मिळाली. कु. श्रावणी घोडेस्वार या नॅशनल सायकल चॅम्पियन तरुणीचा प्रेरणादायी सहभाग होता. 

संत गाडगेबाबा पतसंस्थेच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा शुभारंभ सरपंच दिपाली पाटील यांचे हस्ते झाला. प्रतापसिंह माने प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. द्वितीय बिट्टू थोरात, तृतीय पांडुरंग खेरमोडे, चतुर्थ प्रताप थोरात, पाचवा क्रमांक एन. टी. पाटील यांनी पटकावला. एल. एस. पाटील, प्रकाश पाटील, के. व्ही. भोईटे, सुरेश खडके, विश्वनाथ गुरव, बाबासाहेब तिबीले, बी. आय. पाटील, डॉ. प्रकाश शेंडगे, प्रदीप पाटील, सागर डवंग, डॉ. सचिन शिंगटे यांचे परिश्रम लाभले. पोखरणीचे सरपंच विश्वनाथ जाधव तसेच भडकंबेचे माजी सरपंच शहाजी पाटील हे मान्यवर उपस्थित होते.