महेश भट्ट यांच्यासोबत मलायका अरोराचं रोमॅन्टिक शूट? सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

मलायका अरोरा (Malaika Arora) म्हणजे, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत. वयाची पन्नाशी ओलांडलेली मलायका आजही अनेकांच्या दिलाची धडकन आहे. पण, सध्या याच मलायकाचे दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यासोबतचे रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सध्या खळबळ माजली आहे. दरम्यान, बऱ्याच काळापासून मलायका अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत होती, अशातच काही काळापूर्वीच दोघांचं ब्रेकअप झाल्याचं उघड झालं आहे. अशातच आता महेश भट्ट यांच्यासोबतच्या रोमॅन्टिक व्हिडीओमुळे चाहत्यांनाही प्रश्न पडला आहे. 

मलायका अरोरा आणि महेश भट्ट यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सारेच अवाक् झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा महेश भट्ट यांच्यासोबत बेडरूममध्ये दिसत आहे. अनेकजण हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा करत आहेत. तर, अनेकजण मलायका आणि महेश भट्ट एक रोमॅन्टिक व्हिडीओ अल्बम शूट करत आहेत, असंही म्हणत आहेत. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा महेश भट्टच्या मिठीत दिसतेय. एवढंच नाहीतर आणखी एका व्हिडीओमध्ये ती एका अजगरासोबत झोपलेली दिसत आहे. मलायका अरोराचा हा बेडरूम व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून त्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा महेश भट्ट आणि मलायकाचा व्हिडीओ यामध्ये काहीही तथ्य नाही. व्हायरल होणारा व्हिडीओ पूर्णपणे एडिट केलेला आहे. दोघे कोणताही रोमॅन्टिक व्हिडीओ अल्बम शूट करत नाहीत. पण असं असूनही लोक या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.