अनेक लोक असे आहेत ज्यांना उन्हाळ्यात हिल्स स्टेशनला फिरायला जायला आवडते. अनेक लोक स्वित्झर्लंडला जातात. पण तुम्हाला बजेटमध्ये हिल्स स्टेशनला फिरायला जायचे असेल तर अरुणाचल प्रदेशातील दिबांग जिल्ह्यात असलेली अनिनी व्हॅलीला भेट देऊ शकता. या ठिकाणाला त्याच्या सौंदर्यामुळे आणि शांत वातावरणामुळे भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं. येथील बर्फाळ पर्वत, घनदाट जंगले, हिरव्यागार दऱ्या आणि थंड हवामान याला एक वेगळी ओळख देते. हे ठिकाण अजूनही अनेक लोकांना माहिती नाही.

हवामान
अनिनी व्हॅली सर्व बाजूंनी हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहे. येथील हवामान वर्षभर थंड आणि आल्हाददायक राहते. हिवाळ्यात येथील टेकड्या आणि दऱ्या बर्फाच्या चादरीने झाकलेल्या असतात, ज्यामुळे ते स्वित्झर्लंडसारखे दिसते. उन्हाळ्यातही येथील तापमान खूपच कमी राहते.यामुळे ते एक परिपूर्ण पर्यटन स्थळ बनते. जर तुम्ही अजून अनिनी व्हॅली पाहिली नसेल तर लवकरच तुमच्या ट्रिपचे नियोजन करू शकता. तुम्हाला ट्रेकिंग आणि फोटोग्राफीची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे.
कधी जावे?
अनिनी व्हॅलीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मार्च, एप्रिल,मे दरम्यान असतो. या काळात येथील हवामान आल्हाददायक आणि थंड राहते. यामुळे पर्यटक येथील सुंदर दऱ्या आणि नैसर्गिक दृश्यांचा आरामात आनंद घेऊ शकतात.
अनिनी व्हॅलीमधील भेट देण्याची ठिकाणे

मिपी व्हॅली
मिपी व्हॅली हे अनिनीमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हा परिसर नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. तुम्हाला हिरवीगारे जंगले, थंड वारा आणि बर्फाच्छादित पर्वत दिसतात. हे ठिकाण ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे.

दिबांग वन्यजीव अभयारण्
हे वन्यजीव अभयारण्य दुर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांचे निवासस्थान आहे. येथे हिमालयीन अस्वल, लाल पांडा, हिम बिबट्या आणि मिथुन सारखे प्राणी आढळतात. जर तुम्हाला निसर्ग फिरायला जाण्याची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे.

दिबांग नदी
दिबांग नदी ही या प्रदेशातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. त्याचे थंड आणि स्वच्छ पाणी, हिरवेगार किनारे आणि आजूबाजूचे पर्वत यामुळे ते एक उत्तम पिकनिक स्पॉट बनले आहे. येथे राफ्टिंग आणि मासेमारीसारखे साहसी खेळांचा अनूभव घेता येईल.

मेनचुखा धबधबा
हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी जणू स्वर्ग आहे. खोली आणि उंचीवरून पडणारे पाणी एक विहंगम दृश्य सादर करते. येथील शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला आरामदायी वाटेल.