पंढरपूर शहरामध्ये राबवले स्वच्छता अभियान: २३ टन कचरा गोळा

महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, यांचे सौजन्याने पंढरपूर येथे स्वच्छता अभियान पंढरपूर येथे पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार शहराच्या विविध ठिकाणी १५०० श्री सदस्यमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. या स्वच्छता अभियानामध्ये २३ टन कचरा गोळा झाला आहे. सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून करण्यात आली.

या कार्यक्रमाला तहसीलदार सचिन लंगुटे, पोलिस उपअधिक्षक डॉ. अर्जुन भोसले, प्रशासनाधिकारी सुनील वाळुजकर, शहर पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, स्वच्छता विभाग डॉ. शरद वाघमारे, डॉ. तोडकर, सोमनाथ डोंबे, राधेश बादल, प्रशांत खलीपे , अमित शिरगावकर, डॉ. मंदार सोनवणे, मंदार लोहकरे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. 

तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरातील विविध १५ ठिकाणी १५०० श्री सदस्यांनी ३३ वाहनांमधून, व ३ कॉम्पॅक्टर च्या सहाय्याने २३ टन कचरा गोळा करुन जुना कासेगाव रोडवरील कचरा डेपो येथे पाठवला असल्याची माहिती पंढरपूर नगरपालिकेने दिली आहे. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप मांडवे, प्रशांत शिंदे, विजय वरपे यांचेसह मोठ्या प्रमाणात श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता.