सुहास भैया बाबर यांना आटपाडीच्या पुजारवाडीतून जबरदस्त प्रतिसाद….

कायम दुष्काळी असणाऱ्या आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेपासून वंचित असणाऱ्या गावांसाठी टेंभू सहावा टप्पा स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला होता. त्याचा भूमिपूजन समारंभ नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांनी संपन्न केला. त्यामुळे या योजनेच्या सहाव्या टप्प्यास गती मिळाली असून आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी येथे या योजनेच्या पाईप पोहोचल्या आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.

अमर रहे अमर रहे अनिल भाऊ अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमला व या निवडणुकीमध्ये सुहास बाबर यांच्या पाठीशी ठाम राहण्याची भूमिका घेतली असल्याचे अनेकांनी सांगितले.