सांगोला तालुक्यातील स्पंदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मेंदूवरील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया 

सत्तर वर्षीय वृद्ध अचानक बेशुद्ध पडला, बोलू शकत नव्हता, हात-पाय हलवू शकत नव्हता. सदर व्यक्तीस सांगोला येथील एका दवाखान्यात आणले असता प्राथमिक अवस्थेमध्ये मेंदूमध्ये रक्तपुरवठा बंद झाला असल्याचे निदान डॉक्टरांनी केले व सोलापूर येथील मेंदू मणका उपचार असलेल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन जावे लागेल, असे सांगितले कुटुंबातील व्यक्तींना मात्र आत्ता काय करावे हे कळेना, त्याच वेळेस पेशंटस स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जुना मेडशिंगी रोड वाढेगांव नाका येथे आणण्यात आले. 

स्पंदन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने तपासणी करून मेंदूचे स्कॅन केले, त्यामध्ये उजव्या बाजूची मेंदूच्या रक्तवाहिनी मध्ये रक्तपुरवठा बंद झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले. ही अवस्था अतिशय गंभीर स्वरूपाची अवस्था असते त्यावेळी नातेवाईकांना सर्व परिस्थितीची कल्पना नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी तुमच्याकडे जेवढे होता होईल, तेवढे करा स्पंदनमध्ये उपचार होणार नसेल तर पेशंट आम्ही घरी घेऊन जातो. असा विश्वास दाखवल्यामुळे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ची टीम कामाला लागली. 

सांगलीचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. देवदत्त पाटील यांना सर्व रिपोर्ट व तपासण्या पाठवून दिले असता, त्यांनी ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार नातेवाईकांशी बोलून त्यांना संपूर्ण परिस्थितीचे कल्पना दिली असता त्यांनी ऑपरेशन करण्यास संमती दिली व रविवार दिनांक २ मार्च रोजी मेंदू व मनका तज्ञ डॉ. देवदत्त पाटील व त्यांच्या टीम ने क्रेनिओटॉमी नावाचे मेंदूवरील दाब कमी करण्याचे गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. यावेळी भूल तज्ञ म्हणून डॉ. शीतल येळपले यांनी काम पाहिले सदर ऑपरेशन अतिशय किचकट व गुंतागुंतीचे होते हे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत स्पंदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदू, मणका, फ फुस, क्रिटिकल केअर, लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार हाडांचे आजार, पोटाचे आजार, नवजात बालक व आतड्यांच्या शस्त्रक्रिया अपघात इत्यादी विविध आजारांवर मोफत उपचार केले जातात त्याचबरोबर सर्व कंपन्यांचे कॅशलेस इन्शुरन्स उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. सदर पत्रकार परिषदेस डॉ. योगेश बाबर, डॉ. किरण जगताप डॉ वैभव जांगळे, डॉ गणेश गुरव, राहुल इंगोले उपस्थित होते.