Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीस २१०० मिळणार नाहीत

राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यावर लाडक्या बहिणींना दिले जाणारे १५०० रुपये वाढवून २१०० रुपये देणार, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. तसेच हे २१०० मार्च महिन्यानंतर दिले जाणार असे सांगण्यात आले होते. मात्र, आता यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेद्वारे २१०० रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही, असे वक्तव्य महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. येत्या पहा अर्थसंकल्पात किंवा आल्यावर अधिवेशनाच्या काळात २१०० रुपये देऊ, असे कोणतेही वक्तव्य आम्ही केले नव्हते.

सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा जाहीरनामा हा ५ वर्षांचा असतो. या अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव शासनाजवळ ठेवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण बहिणींना  योजनेच्या २१०० रुपयांबाबतची घोषणा होण्याची शक्यता होती. राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणी या २१०० रुपयांची वाट पाहत होत्या, मात्र आदिती तटकरेंच्या वक्तव्याने राज्यातील लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली आहे.

दरम्यान, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक चांगली बातमीही आदिती तटकरेंनी दिली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकदमच खात्यात येणार आहेत.