कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा ही सर्वसामान्य कोल्हापूर वासीयांची यात्रा आहे. भक्तीभावाने तीन दिवस पार पडणाऱ्या या यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी २००८ पासून राजेश क्षीरसागर फौंडेशनच्यावतीने मोफत आरोग् शिबीर आणि सकाळच्या सत्रात मोफत अल्पोपहार वाटपाचे आयोजन करण्यात येत आहे.
यंदाही भाविकांसाठी ही सेवा अखंडित सुरु राहणार असून, राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर दि. २४ व २५ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिर आणि अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फौंडेशनच्या अध्यक्षा वैशाली राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.