खानापूर नगरपंचायतकडून घरपट्टी व पाणीपट्टी कर थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांवर कारवाई सुरू आहे. नागरिकांनी चागल्या सुविधा देण्याकरिता कर वसुली आवश्यक आहे. मात्र नागरिक वेळेत कर भरत नसल्याने नगरपंचायतने कर वसुली मोहीम सुरु केली आहे. कर वसुली व्हावी यासाठी नगरपंचायतने घंटागाडी वरून घरपट्टी व पाणीपट्टी कर भरण्याची दवंडी सुरू केली आहे. नगरपंचायतने आत्ता पर्यंत ४९ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करून कारवाई केली आहे. सर्व थकबाकीदारांना घरोघरी जाऊन कर भरण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.
तसेच एकूण ५५ थकबाकीदार मालमत्ताधारकांना जप्तीच्या कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच शहरात विविध ठिकाणी थकबाकीदारांच्या यादीचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. थकबाकीदारांनी त्वरित कर भरणा करावा अन्यथा त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी भरुन नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती सोनाली यादव यांनी केले आहे.