रेंदाळ यात्रेत जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण ; तिघांविरोधात गुन्हा दाखल 

हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेनिमित्ताने आयोजित कलापथकावेळी किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकरणी पोवार पिता-पुत्राच्या विरोधात जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. बाळासो ऊर्फ बंडा बापू पोवार, सचिन पोवार, नितीन पोवार अशी आरोपींची नावे आहेत. याबाबतची फिर्याद शुभम सुनील शिंदे यांनी हुपरी पोलिसांत दिली आहे.

 रेंदाळ येथे बिरदेव यात्रेनिमित्ताने शनिवारी रात्री कलापथकाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेड्स सातत्याने हलविण्यात येत असल्याने बाळासो ऊर्फ बंडा पोवार यांनी बॅरिकेड्स का हलवत आहेस, असे म्हणून शुभम शिंदे याला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांची मुले सचिन व नितीन पोवार यांना तेथे बोलावून घेऊन मारहाण केली. यावेळी गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी आरोपींनी काढून घेतल्याची फिर्याद शुभम शिंदे याने हुपरी पोलिसांत दिली आहे.