इस्लामपूर भारतीय समाज अधिक विज्ञाननिष्ठ व विवेकी बनवा या उद्देशाने इस्लामपूर येथे विवेक जागर संस्था, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूर व मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या विवेक वाहिनी विभाग, आम्ही वारस विवेकाचे सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. अब्राहम कोवूर यांच्या जयंतीनिमित्त ‘चमत्कार सादरीकरण एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दि. १० एप्रिल रोजी केले आहे. कार्यशाळेत अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे व विज्ञान बोधवाहिनीचे राज्य कार्यवाह भास्कर सदाकळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यशाळेत चमत्काराच्या विविध प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखवून प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थीना भोंदू बाबा भक्तांना चमत्कार कसे करून फसवितात याचे हँड टू हॅन्ड प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी जे इच्छुक असतील त्यांनी त्वरित आपली नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी संपर्क संख्या मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. असे आवाहन अंनिसचे शहराध्यक्ष चंद्रकांत कोळी यांनी केले आहे. संजय बनसोडे, प्रा. के. बी. पाटील, प्रा. डॉ. राम घुले, अजय भालकर, अनिकेत अंगवणे संयोजन करत आहेत.