सांगोला नगरपालिकेच्यावतीने महिला दिनानिम्मित अनेक कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ६, ७,व ८ मार्च २०२५ रोजी विविध स्पर्धा, कार्यशाळा व प्रशिक्षण व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. ६ मार्च रोजी पाककला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही स्पर्धेकरिता प्रत्येकी रु. ५ हजार, ३ हजार, व २ हजार अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाकरिता बक्षीस ठेवण्यात आले होते. यापैकी पाककला स्पर्धेमध्ये श्रीम. अफरीन पठाण, विद्या तेली, माधवी खडतरे व रांगोळी स्पर्धेमध्ये श्रीमती रेश्मा दिवटे सुप्रिया दौडे व गायत्री पाटणे अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय बक्षीसाचे मानकरी ठरले.


दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी सांगोला नगरपरिषदेमार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. यापुढेही महिलांसाठी स्वयंरोजगारासाठी व स्वसंरक्षणाणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे प्रतिपादन केले होम मिनिस्टर कार्यक्रमला महिलांनी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाच्या विविध खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतल्याचे पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यावेळी सांगोला नगर परिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी श्रीमती अस्मिता निकम, कर निरीक्षक श्रीमती प्रियांका पाटील, श्री. रोहित गाडे, कार्यालय अधीक्षक श्री. सचिन पाडे, श्री. योगेश गंगाधरे व नगरपरिषदेचे विभाग प्रमुख इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.