आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेच्या कामात अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि वंचित गावांना टेंभूचे पाणी पूर्ण क्षमतेने द्यावे, या मागणीसाठी भाजप एस. सी. मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेखर रणदिवे, बसपा जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपअभियंता शिवाजी पाटील, कनिष्ठ अभियंता शुभम जाधव, स्वस्तिक कंपनीचे सागर घागरे यांची चौकशी करावी, यासाठी हे उपोषण करण्यात आले आहे.
आटपाडी तालुक्यातील टेंभूच्या चौकशीसाठी उपोषण
