आटपाडी शहरातील विठ्ठलनगर येथील नंदीवाले वस्ती परिसरातील अस्वच्छता आणि तुंबलेल्या गटारीचे सोशल मीडियाच्या माध्यमातून दर्शन देऊन सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर महेश पाटील यांनी नागरपंचायतला निवेदन दिले आहे.
यावेळी महेश पाटील यांनी विठ्ठल नगर परिसरातील लोकांना सोबत घेऊन विठ्ठल नगर परिसरातच हे निवदेन नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले. अस्वच्छतेमुळे होत असलेली रोगराई आणि तुंबलेल्या गटारीमुळे नागरिकांना आरोगयविषयक त्रास होत आहे. यावेळी मुख्यधिकारी वैभव हजारे यांना येथील अनेक समस्या दाखवण्यात आल्या . कामांमध्ये तसे चुकीच्या झालेल्या कामांमध्ये काय चांगले पर्याय निघू शकता यावरही यावेळी चर्चा करण्यात आली . दोन दिवसांमध्ये हा परिसर स्वच्छकरण्याची नागरिकांनी केली आहे.
