रेंदाळ येथे महिलेला जीवे मारण्याची धमकी; आठजणांवर गुन्हा 

हातकणंगले तालुक्यातील  रेंदाळ येथे राहत्या घराच्या दरवाजावर दगड व लाथा-बुक्क्यांनी मारून महिलेला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शुभम शिंदे, वाय. बी. रेंदाळकर, संतोष शिंगे, रोहित कांबळे, बाजीराव कांबळे यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात हुपरी पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. याबाबतची फिर्याद महिलेने दिली. ८ मार्च रोजी सकाळी घराच्या दारात जाऊन संशयितांनी दरवाजावर दगड व लाथा-बुक्क्या मारल्या. जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब हजारे करीत आहेत.