इस्लामपूर येथील जुनी भाजी मंडई परिसरातील कोट (मंत्री) तलाव हजरत पीर मोहब्बत सुलेमान बाबा माँसाहेब दर्ग्याचा उरूस रविवार पासून सुरू होत आहे. दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रविवारी संदल शरीफ होणार आहे. सोमवारी उर्स शरीफ होणार आहे. त्याच दिवशी लंगर खाना, गिलाफ शरीफ, गलेफ असे कार्यक्रम होणार आहेत. ३०० वर्षांची परंपरा असणारा हा दर्गा सर्वधर्मीय ऐक्याचे प्रतीक आहे. ३०० वर्षांपूर्वी मंत्री तलावामध्ये हजरत पीर मोहब्बत सुलेमान बाबांनी समाधी घेतल्यानंतर त्यावेळच्या मंत्री कुटुंबीयांनी अनेक वर्षे देखभाल केली.
गेल्या ५ पिढ्यांपासून दर्ग्याचे मानकरी म्हणून काम पाहणारे राजेंद्र शिंदे सरकार, शिरीष शिंदे सरकार, संजय शिंदे सरकार, विशाल शिंदे सरकार, इंद्रजीत शिंदे सरकार, रुद्र शिंदे- सरकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत गलेफ मिरवणूक काढण्यात येते. रात्री उशिरा दर्यामध्ये गलेफ चढविण्यात येतो. उरुण परिसरातील मुबारक युसूफ मुल्ला, आय.के.मुल्ला अल्लाउद्दीन अमिन मुल्ला हे या दर्म्याचे मुजावर म्हणून दररोजची देखरेख करतात. आक्रम पठाण, आप्पा पठाण, फिरोज जमादार, आबीद नायकवडी झाकीर मुल्ला संयोजन करत आहेत. या दर्ग्यात शिंदे सरकार यांचा मानाचा गलेफ चढविल्यानंतर तीन दिवस कोणाचाही गलेफ चढविला जात नाही. सोमवारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.