विटा येथील यात्रेसाठी वर्गणी दिली नाहीस, त्यामुळे देवीची आरती करू नको, असे म्हटल्याने एकाने थेट दगडच डोक्यात घातला. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजता विटा येथील लक्ष्मीनगरमधील देवीच्या मंदिरात घडली. याप्रकरणी सागर सर्जेराव जाधव यांच्या माहितीनुसार बलजित प्रकाश जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. येथील सागर जाधव हे १३ मार्च रोजी रात्री ८ वाजता महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी परिवारासह आले होते. त्यावेळी बलजित जाधव हाही मंदिरात आला होता.
यावेळी सागर जाधव याच्या वडिलांनी त्याला, देवीच्या यात्रेकरिता वर्गणी दिली नाहीस, त्यामुळे तू देवीची आरती करू नकोस’, असे सांगितले. त्यावर बलजित याने सागरच्या वडिलांना शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी सागरने बलजितला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने चिडून दगड घेऊन सागरच्या डोक्यात घातला. हल्ल्यात सागर यांच्या डोक्याला गंभीर दरवापत झाली आहे
