आटपाडी तालुक्यातील तळेवाडी येथे सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास उन्हाळ्यामुळे घराच्या बाहेर कट्यावर रात्री झोपलेल्या वृद्ध जोडप्याच्या उशाला ठेवलेली रक्कम दमदाटी करून चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत शामराव नागू पडळकर यांनी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री शामराव पडळकर व त्यांची पत्नी मालन घरासमोरील कट्यावरती रात्री जेवण करून झोपले होते.
मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास झोपलेल्या मालन यांच्या उशाखाली ठेवलेली बंडी दमदाटी करून तीन अज्ञात चोरट्याने हिसकावून घेतली. त्यामध्ये ठेवलेले एक लाख पन्नास हजार रुपये चोरून नेले आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विनय बहिर, सहायक पोलिस निरीक्षक विशेंद्रसिंह बायस यांनी भेट दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजीव केंद्रे करीत आहेत.