हातकणंगले तालुक्यातील येथे कबनूर उरुसास गुरुवारपासून प्रारंभ; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून प्रसिध्द असलेला ग्रामदैवत जंदीसाहेब-ब्रॉनसाहेब यांचा ऊरुस गुरुवारी २७ मार्च रोजी पासून सुरू होत आहे. यानिमित्त ऊरुस समितीतर्फे विविध स्पर्धा, मनोरंजनाच्या व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामदैवत जंदीसो-ब्रॉनसो ऊरुस समिती यांचे मार्फत केले असून ग्रामस्थ व भाविकांनी ऊरुस शांततेत पार पाडावा असे आवाहन समिती अध्यक्षा सौ. सुलोचना कट्टी व उपाध्यक्ष सुधीर . लिगाडे यानी पत्रकार बैठकीत केले.

बुधवारी २६ रोजी कव्वालीचा मुकाबला, देवांच्या तुरबतीना पाणी घालणे व गंधरात्र, गुरुवारी २७ रोजी लहान गट व मोठा गट पळण्याच्या शर्यती, सायकल शर्यती व रात्री लोकनाट्य तमाशा, शुक्रवारी पहाटे ४.१५ वा. शोभेच्या दारुच्या आतषबाजीत सरकारी गलिफ, सकाळी बैलगाडी शर्यती, निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, रात्री आर्केस्टा शनिवारी २९ रोजी मोटर सायकल बरोबर म्हैस पळवणे, फक्त महिलांसाठी लावणीचा कार्यक्रम, रविवारी ३० रोजी गुढी पाडव्या निमित्त गावगन्ना बैलगाडी शर्यत, मैदानी खेळाची प्रात्यक्षिके, पोवाडा, सोमवारी ३१ रोजी भीमगीतांचा कार्यक्रम व रविवारी ६ एप्रिल व्हॉलीबॉल स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

याशिवाय बुधवारी २६ रोजी मनोरंजनाच्या विविध खेळांचे आयोजन केले आहे. सदर बैठकीस ग्रामपंचायत सदस्य मधुकर मणेरे, समीर जमादार व नितीन काडाप्पा उपस्थित होते.