खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची उपकेंद्र आमदार सुहास भैया बाबर यांनी मंजूर करून आणले असून खानापूर शहर चा विकास होणार आहे. याबरोबर मूलभूत गरजा वाढणार असून पिण्याच्या पाण्याची गरज वाढणार आहे. स्वामीचा तलाव व सुतारकीचा तलाव याची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना रोजगार पुरवण्यासाठी करण्यात आली होती. पाझर तलावासाठी बंधाऱ्याच्या मध्यभागी काळ्या मातीचा गाभा आवश्यक असतो. परंतु मजुरांना काम रोजगार देणे उद्देश असल्यामुळे पुरेशी मातीची कॉलेटी नसताना सुद्धा काम पूर्ण झाले असून त्यामध्ये किंचितही पाणी साठवून राहत नाही.
कैं.आमदार अनिल भाऊंनी हायस्कूलच्या पाठीमागे धबीचा तलाव साठवण तलाव करण्यासाठी मजबूत अशी पुनर्बांधणी केली. त्यामुळे तलावामध्ये पाणी साठवून राहू लागले याच धर्तीवर या दोन्ही तलावांची मजबूत पुनर्बांधणी केली तर पाणी साठवून राहू लागेल भविष्यात बऱ्याच अंशी पाण्याचा प्रश्न मिटेल तरी आमदार सुहास भैया बाबर यांनी जातीने लक्ष घालून हे सुद्धा काम हे पूर्णत्वास न्यावे अशी खानापूर नगर वासी यांची अपेक्षा आहे.