हातकणंगले तालुक्यातील महेश स्पिनिंग मिलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट; जलजीवन योजनेसंदर्भात अजितदादांचे नो कॉमेन्टस्

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ नजीक असणाऱ्या महेश को ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट दिली.  यावेळी सारीका सुर्यवंशी संगिता सुर्यवंशी व मेघा चाळके यांनी उपमुख्यमंत्री यांचे औक्षण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुरुवारी कोल्हापूर जिल्हा दौरा होता. यावेळी तारदाळ नजीक असणाऱ्या स्पिनिंग मिल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते.

यावेळी तारदाळ मधील काही पत्रकारांनी तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत माहिती देत योजनेसाठी राज्यशासनाकडून वेळेत निधी मिळत नसल्याने सदरची कामे रखडली आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री यांना विचारले असता त्यांनी लेखी माहिती कागदवर द्या, असे सांगत या विषयावर आपले बोलणे टाळले. व काही क्षणातच गाड्यांचा ताफा इचलकरंजीकडे रवाना झाला.