महंमद गझनीने १०२६ साली सोमनाथ ज्योतिर्लिंगावर यशस्वी आक्रमण केले होते. परंतु, मंदिरातील ज्योतिर्लिंगाचे अंश स्थानिक पुजाऱ्यांनी सुरक्षित ठेवले होते. हे अंश शेकडो वर्षे गुप्त ठेवून त्यांच्या पूजेची परंपरा अखंड सुरू राहिली. १९२४ साली हे अंशकांची शंकराचार्य यांना दाखवण्यात आले. त्यांनी हे अंश १०० वर्षे अधिक काळ सुरक्षित ठेवून, २०२४ मध्ये श्री श्री रविशंकर यांच्याकडे पुनःस्थापनेसाठी देण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या महाशिवरात्रीला बंगळुरू येथील आश्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगावर रुद्राभिषेक करून त्याचे भव्य दर्शन भारतभर सुरू केले.
इचलकरंजी येथील नामदेव भवन येथे १००० वर्षांपूर्वीचे मूळ सोमनाथ शिवलिंग “दर्शन यात्रे” निमित्त आले होते. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये धनगरी ढोलांसोबत उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले सोबत आर्ट ऑफ लिविंग गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांचे शिष्य वरिष्ठ प्रशिक्षक दर्शक हाथी जी तसेच वेद विज्ञान महाविद्यापीठ बेंगलोर येथील वैदिक पंडित जी यांचे स्वागत करण्यात आले. दिवसभर दर्शनासाठी भक्तांची रिघ लागली होती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मनोभावे दर्शन घेतले.
सायंकाळी मोठ्या उत्साहाने सत्संगाचा कार्यक्रम पार पडला दर्शन आणि सत्संग यामध्ये दिवसभरामध्ये 2000 पेक्षा अधिक भक्त सहभागी झाले. यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदंडे भैय्या तसेच स्वयंसेवक नमिता हूल्ले, राहुल रायनाडे,मनोहर कुंभोजे विजय साळुंखे,नितीन जमाले, गोपाल चांडक, प्रदीप दरीबे,महेशजी सारडा, संगीता सारडा सर्वेश जी बांगड,विशाल पाटील, दीपक हिंगलजे,कमलेश्वर कदम यांनी सेवा दिली.