आटपाडी येथे ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते आदर्श शिक्षका पुरस्कारांचे वितरण

आटपाडी येथे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने ३१ शिक्षिकांचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जयकुमार गोरे उपस्थित होते. ते कार्यक्रमात बोलत होते कि, दीड लाख पगार घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या दाम्पत्याचा मुलगा इंग्लिश मीडियम शाळेत शिकतो आणि त्या इंग्लिश मीडियम मधील शिकवणाऱ्या मॅडमला पगार १२ हजार आहे. शाळेचा पट का कमी होत आहे, याकडे शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले.

सध्या इंग्लिश माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. इंग्रजी आले पाहिजे, मात्र आपली संस्कृती सोडून या गोष्टी होता कामा नये. आता इंग्रजी माध्यमाकडे ओढा का वाढला याचा विचार शिक्षकांनी करण्याची वेळ आली आहे. ज्या प्राथमिक शाळांचा पट जास्त आहे, अशा शाळांची यादी करून तिथला अभ्यास करणे गरजेचे आहे. शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही, मात्र शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण सोडू नये, असे ही मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी आवाहन केले.