कुंभोज (ता. हातकलंगले) येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड सोमवारी संपन्न झाली, सरपंच पदासाठी महाविकास आघाडीच्या सदस्य जयश्री दगडू महापुरे यांनी एकमेव अर्ज दाखल केला. सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेट्टी यांनी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली.
महाविकास आघाडीच्या उमेदवार स्मिता चीगुले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान सोमवारी झालेल्या सरपंच पदासाठी जयश्री महापुरे यांची निवड करण्यात आली. नूतन सरपंच जयश्री महापुरे यांचा सत्कार मावळत्या सरंपच स्मिता चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील, जवाहरचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, शरदचे संचालक आप्पासाहेब चौगुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण, दगडू महापुरे, सदानंद महापुरे, धनाजी तिवडे, बाळासो डोणे, योहान घाटगे, दावीद घाटगे, प्रदिप महापुरे, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.