पेठ (ता. वाळवा) येथील राजारामबापू सहकारी बँकेच्या (Rajarambapu Bank) अध्यक्षपदी विजयराव विठ्ठलराव यादव यांची, तर उपाध्यक्षपदी माणिक शामराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. उपनिबंधक संभाजी पाटील हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते मावळते अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांचा सत्कार झाला.
माजी मंत्री आ. जयंतराव पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, प्रतिकदादा पाटील यांनी नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष- उपाध्यक्ष यांनी संचालक मंडळ व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यासमवेत कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत डॉ. प्रकाश पाटील यांनी अध्यक्ष पदासाठी विजयराव यादव यांचे
नांव सुचविले, त्यास धनाजी पाटील यांनी अनुमोदन दिले. सुभाषराव सुर्यवंशी यांनी उपाध्यक्ष पदासाठी माणिक पाटील यांचे नांव सुचविले, त्यास आनंदराव लकेसर यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, प्राचार्य आर. डी. सावंत, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, प्रदेश सदस्या कमल पाटील यांच्यासह बँकेचे संचालक, तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नेर्ले गांवचे सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले.